ब्रेकिंग
प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून कृषी कन्यांनी ग्रामस्थांना समजावला गावचा आराखडा

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी :- (गाव- सोनाळवाडी, ता- कर्जत ,जि-अहमदनगर) प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषी कन्यांनी सोनाळवाडी गावात गावच्या नकाशाची रांगोळी काढली. त्यामध्ये मुख्यत्वे त्यांनी सोनाळवाडी गावातील प्रमुख ठिकाणे दर्शवली.
नकाशाचा आराखडा ग्रामस्थांना समजावून सांगितला. या कार्यानुभुवात समस्त ग्रामस्थांनी सहभाग दर्शविला.
या कार्यक्रमात गावचे सरपंच मा.श्री.बाळासाहेब काळे ,पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रेरणा सावळे ,कृषी सहाय्यक अधिकारी मा.श्री.दत्ता भोसले, ग्रामसेवक सौ. अरुणा गलांडे, सेंद्रिय शेती करणारे मा.श्री.गणेश रंगनाथ काळे, सदस्य मा.श्री.संजय भोंडवे व समस्थ सोनाळवाडी चे ग्रामस्थ उपस्थित होते. अखेरीस सर्वांनी कृषीकन्यांनी केलेल्या या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले.