कर्जत येथून मुंबईला दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राशिन शहर सेनेच्या वतीने सोने देऊन स्वागत.

राशीन, प्रतिनिधी जावेद काझी. : – शिंदे सेनेच्या वतीने मुंबई येथे आज सायंकाळी होणाऱ्या विजयादशमी दसरा मेळाव्यासाठी कर्जत तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख तालुका बापूसाहेब नेटके,
युवा सेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने बस द्वारे दसरा मेळाव्यासाठी निघाले असता या सर्व मान्यवरांचे राशीन शहर शिवसेनेच्या वतीने आई जगदंबेच्या नगरीत दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने भेट देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच पुढील वाटचालीस राशिन शहर शिंदे सेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिंदे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी, जिल्हा परिषद गटप्रमुख विलास काळे, राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे, युवा सेना प्रमुख योगेश भवर, सेना नेते मच्छिंद्र सुद्रिक, माजी शहर प्रमुख गणेश मोढळे, इतर शिवसेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.