राशीन मध्ये शिंदे सेनेच्या वतीने जगदंबा देवी दर्शनासाठी आलेल्या भक्तांना फळ व पाणी वाटप.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी.:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील राशीन येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या शिंदे शिवसेनेच्या वतीने जगदंबा देवीच्या आज आठव्या माळेचे अवचित्य साधत नवरात्रीनिमित्त भाविक भक्तांना व इतर नागरिकांना तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फळांचे व पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी शिंदे सेनेचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. शबनम इनामदार, कर्जत तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके,
राशीन जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. कमल मासाळ, तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी, शिवसेना नेते राहुल गाडे, राशीन शहराध्यक्ष दीपक जंजिरे, युवा सेना शहर प्रमुख योगेश भवर ,पै.गणेश मोढळे, दुर्वे वाघ, सागर कटके, गोरख लाहोर, महादेव पंडित, सचिन दंडे, सौरभ काळे, उमेश काळे, व इतर शिंदे सेना समर्थक ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.