नवरात्री काळा दरम्यान राशीनच्या मुख्य बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य प्रशासन दुर्लक्षित शिंदे शिवसेनेकडून रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन येथे श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सव यात्रा सुरू झाली असून मुख्य बाजारपेठेतील दौंड-धाराशिव राज्य मार्गावरील ड्रेनेज लाईनचे (गटार) काम अर्धवट स्वरूपात झाले असल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील रस्ता धुळीने माखला आहे.
या त्रासदायक धुळीमुळे मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांचे, तसेच जगदंबा देवी दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे खोकला,सर्दी घसा, अशा दीर्घ
आजारांना नवरात्री काळात भाविक भक्त व इतर ग्रामस्थ त्रस्त झाले असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक बाळासाहेबांची राशीन शहर शिवसेनंने च्या वतीने नवरात्री इतर काळात दिवसातून तीन वेळा धुळेने माखलेल्या रस्त्यावर टँकरद्वारे पाणी मारावे जेणेकरून धुळीचे प्रमाण कमी होईल तसेच यात्रेदरम्यान भाविक भक्तांच्या आरोग्यास धोका होणार नाही म्हणूनच या रस्त्यावर पाण्याचा मारा करावा तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन नवरात्र यात्रा काळात छेडण्याचा इशारा.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके,राशिन शहराध्यक्ष दीपक जंजिरे, जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी , युवा सेना शहर प्रमुख योगेश भवर, यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी स्वरूपात दिला आहे.