आपली भूमिका खुली आहे. लोकप्रतिनिधीं ठरवतेल, अन्यथा लोकाग्रहास्तव सरपंच पदाची अपक्ष उमेदवारी करणारच

कर्जत (प्रतिनिधी) : – राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या कर्जत तालुक्यातील कुंभेफळ, धांडेवाडी, नेटकेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उद्योजक संतोष धुमाळ यांच्या पत्नी प्रियांका संतोष धुमाळ यांनी अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज भरला आहे.
कर्जत तालुका दूध संघाचे संचालक बाप्पासाहेब धांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रियंका संतोष धुमाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी कर्जत मा धोदाड, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी धांडे, सेवा संस्थेचे माझी व्हाईस चेअरमन विक्रम धांडे, नामदेव धांडे सुरेश, सुरेश सावंत, माझी व्हाईस चेअरमन अरुण धांडे, राम दळवी शरद धांडे यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील कुंभेफळ ,धांडेवाडी,
नेटकेवाडी ग्रुप ग्रामपंचायत इकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जनतेतून सरपंच निवडणार असल्यामुळे कोण होणार, कोण कोणत्या गटाकडून उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरपंच पदासाठी कर्जत येथील शिवमिल्क दूध संघाचे संचालक , व लोकप्रिय युवा उद्योजक संतोष उर्फ पप्पू शेठ धुमाळ त्यांच्या पत्नी प्रियंका यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रियंका धुमाळ यांनी सांगितले की, यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण काम केलेले आहे तो अनुभव मोठा आहे, या ग्रुप ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायती बनवण्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करणार आहोत, या परिसरातील सर्व समस्यांची आपल्याला माहिती आहे खास करून महिला असल्यामुळे महिलांची प्रश्नांची जाण आहे आणि ते सोडण्यासाठी आपण प्रयत्न करू उमेदवारी अर्ज भरताना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या बाजूने उमेदवारी अर्ज भरलेला नाही मात्र आपली भूमिका खुली आहे. आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली भूमिका निश्चित करणार आहोत असे प्रियांका धुमाळ बोलताना म्हणाल्या.
कर्जत जामखेड मतदार संघामध्ये आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोन्हीही आमदारांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. प्रियांका संतोष धुमाळ या ज्या लोकप्रतिनिधी कडून उमेदवारी अर्ज भरतील त्यांचे पारडे जड मानण्यात येत आहे. यामुळे पुढील काळात प्रियांका संतोष धुमाळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.