दादा पाटील महाविद्यालयात ‘आयडियाचा अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभाग आयोजित ‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ दि. २१ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होतो आहे.
सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयामध्ये सकाळी १२ वाजता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘आयडियाचा अविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या जिमखाना विभागामध्ये करण्यात आले होते.
आयडियाचा अविष्कार स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये पोस्टर्स व उपकरणांच्या माध्यमातून संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. ख्यातनाम विषयतज्ञ व सिनर्जी सायन्स अकॅडमी अहमदनगर येथील डॉ. दत्ता पोंदे यांनी सदर संकल्पकांचे परीक्षण केले.
आयडियाच्या अविष्कार स्पर्धेमध्ये एकूण ६४ संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते. एकूण १०२ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. आयडियाचा अविष्कार संशोधन प्रकल्पाला महाविद्यालयातील ७० प्राध्यापक व ८५० विद्यार्थ्यांनी भेट देऊन संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली
आयडियाचा अविष्कार संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय कांबळे, कर्मवीर विद्याप्रबोधिनीचेे संचालक प्रा. अजित पाटील, सिनर्जी सायन्स अकॅडमी अहमदनगरचे डॉ. दत्ता पोंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेचे संयोजन डॉ. महेश भदाणे व सहकारी समन्वयकांनी केले.
‘कर्मवीर जयंती सप्ताह, कर्मवीर जयंती दर्शन प्रदर्शन व कर्मवीर व्याख्यानमाला’ यांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी व सहकारी समन्वयकांनी केलेले आहे