दादा पाटील महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाला सुरुवात

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलत असताना सुभाषचंद्र तनपुरे यांनी सांगितले की, तरुण पिढीने आपल्या मातीशी इमान राखले पाहिजे. माती ही मौल्यवान साधनसंपत्ती असून तिचे संवर्धन केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, महात्मा गांधींनी जो संदेश दिला होता ‘खेड्याकडे चला’ याच संदेशाला धरून या अभियानाची सुरुवात झाली आहे. प्रत्येकाने आपल्या मातीशी नाळ जोडली पाहिजे, मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तरुण युवक आपल्या मातीशी जोडला जाईल असा आशावाद प्रतिपादन केला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. वाल्मीक कापसे, प्रा. बलभीम महारनवर, डॉ. कैलास रोडगे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.भागवत यादव, प्रा. निकाळे सर, निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल ऑफिसर डॉ. दत्तू शेंडे, विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा. सागर शिंदे, प्रा. प्रकाश धांडे व बहुसंख्य प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.