राशीन शिवसेनेच्या वतीने युनियन बँकेच्या अधिकारी कर्मचारी विरोधात व इतर विविध मागण्या बाबत आमरण उपोषण.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने राशीन शहराध्यक्ष दीपक बापू जंजिरे यांनी युनियन बँक शाखा राशीन यांच्याकडून सर्वसामान्य ग्राहकांवर वारंवार होणाऱ्या चुका व तक्रारीबाबत दिनांक 3/१०/२३ रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. युनियन बँक येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून बँकेचे ग्राहकाची विविध कारणास्तव अडवणूक केली जात असल्याचे वारंवार निदर्शनास आले असून तसेच बँकेचा कारभार रामभरोसे चालला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधी अनेक ग्राहकांनी वेळोवेळी तक्रार करून देखील शाखेतील अधिकारी व कर्मचारी जुमानत नसल्याने याचा त्रास सर्वसामान्य ग्राहकांना विनाकारण भोगावा लागत आहे. जंजिरे यांच्या मते उदा.अर्थ
१) शेतकऱ्यांना शेती कर्ज प्रकरण मंजुरी करतात अढवणूक व नाहक हेलपाटे मानण्यास सांगणे. २) अशिक्षित, अडाणी, सामान्य ग्राहकांना बँकेच्या कागदपत्राची अपूर्ण व अर्धवट माहिती देणे.
३) युवकांना मुद्रा कर्ज बाबत शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यास टाळाटाळ करणे तसेच कर्ज मंजुरी न देणे.
४) गोल्ड लोन करताना नियम भह्य पद्धतीने करणे या संदर्भात चौकशी होणे बाबत.
५) बँकेच्या कामकाजाची वेळ ही ग्राहकांच्या हितावह नसणे.
६) एखाद्या काम संदर्भात विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर देणे.
७) कर्ज प्रकरणाबाबत व शिलेबाजी व एजंटचा वापर करणे.
८) सामान्य ग्राहकांना अरे रावाची भाषा वापरणे, आदर न करणे.
९) अधिकारी व कर्मचारी स्वतः मालक असल्यासारखे वागतात ग्राहकांना दुय्यम वागणूक देतात.
१०) बोगस कर्ज मंजुरी देणे व गरजूंना बाजूला ठेवणे.
अशा विविध मागण्या संदर्भात कसून चौकशी व्हावी याबाबतचे निवेदन
एकनाथजी शिंदे( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर.
प्रांत साहेब कर्जत, तहसीलदार साहेब, व्यवस्थापक झोनल अधिकारी युनियन बँक मुख्य कार्यालय पुणे,
पोलीस स्टेशन कर्जत, यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा शबनम इनामदार, शिवसेना तालुकाध्यक्ष नेटके मेजर, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दीपक जंजिरे, युवा सेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे, युवा नेते पै.गणेश मोढळे, शिवसैनिक वृषभ परदेशी. इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरील सर्व समस्यांचे निवारण झाल्यास युनियन बँक ऑफ राशीन शाखेसमोर बेमुदत उपोषण होणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याबाबतचे निवेदन राशीन शहराध्यक्ष दीपक जंजिरे यांनी दिले आहे.