कर्मवीर जयंती निमित्त प्रतिमा पूजन व कर्जत शहरातून शोभायात्रा

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कर्जत शहरातून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये अनेक विद्यार्थी शोभा यात्रेमध्ये सहभागी झालेले होते.
या शोभायात्रेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी
सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, स्कूल कमिटी सदस्य बाप्पूराव धांडे, माजी मुख्याध्यापक श्री. बागल सर, श्री. दामोदर अडसूळ, ज्ञानदेव लष्कर व
सर्व सामाजिक संघटना कर्जतचे पदाधिकारी, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे प्राचार्य मा. राजकुमार चौरे, सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती इर्शाद पठाण तसेच तिन्ही शाखेतील प्राध्यापक व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला होता.
शोभायात्रे दरम्यान कर्जत शहरात विविध ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेला ग्रामस्थांकडून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नावांचा विद्यार्थ्यांनी जयघोष करत संपूर्ण कर्जत शहर कर्मवीरमय केले. या शोभायात्रेचे स्वागत ग्रामस्थांनी मनोभावे केले.
शोभा यात्रेमध्ये महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ‘वेशभूषा स्पर्धा’ घेण्यात आली. या वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण डॉ. भारती काळे, प्रा. शिल्पा तोडमल यांनी केले. कर्मवीर जयंतीनिमित्त महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग विद्यार्थी वर्ग तसेच सर्व सामाजिक संघटना कर्जत यांच्या वतीने श्रमदान करून ‘श्रमप्रतिष्ठा दिन’ साजरा करण्यात आला.