दादा पाटील महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना ‘दि पाॅवर ऑफ वन’ ची शिष्यवृत्ती

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील तृतीय वर्ष गणित विषयात शिकत असलेल्या सात विद्यार्थ्यांना नुकतीच पुणे येथील दि पाॅवर ऑफ वन या संस्थेची प्रत्येकी पाच हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
मांडगे अभिजीत लाला, गावडे साक्षी भाऊसाहेब, बामणे शुभांगी भरत, अनभुले सौरभ बाळासाहेब, कानगुडे अजय सुनील, कवडे स्नेहा अंकुश, सुपेकर स्नेहा संतोष हे सात शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी आहे.
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना ‘दि पावर ऑफ वन’ संस्थेचे श्री. प्रसाद नारायण, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संजय नगरकर, समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. संदीप गोंदके, गणित विषयाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक म्हस्के, प्रा. अमित नलावडे, प्रा. सागर वाघमारे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समिती, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक वर्ग यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले