ब्रेकिंग
राशीन ग्रामपंचायत च्या वतीने मासाळ कॉलनी येथे भूमिगत गटार कामाचा शुभारंभ.

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- युवक नेते राजेंद्र भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत मासाळ कॉलनी येथे भूमिगत गटारीच्या कामासाठी ४ लाखाचा निधी मंजूर झाला असून भूमिगत गटारीच्या कामाचा शुभारंभ राशीनच्या लोकाभिमुख सरपंच सौ .निलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवकांचे आधारस्तंभ भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल मोढळे, श्रीकांत साळवे, माऊली सायकर,उद्योजक दादासाहेब जाधव, गुलाब धोंडे, गणेश मासाळ, विजय राऊत, ग्रामसेवक प्रशांत भोसले, ईश्वर सोनवणे, डॉ.जगताप आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.