निमगाव डाकू येथे पार पडली तूर पीक कार्यशाळा….

कर्जत (प्रतिनिधी) :- निमगाव डाकू – येथे नुकतेच तूर पीक कार्यशाळेचे आयोजन शिवस्पंदन फार्मर्स प्रोडुसर कंपनी निमगाव डाकू,कृषी विभाग महाराष्ट्र शासन व्ही.सी. डी.एस.अंतर्गत तूर पीक व्यवस्थापन कार्यशाळा यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी दहिगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ एस.एस.कौशिक सर,प्रकल्प अंमलबजावणी कक्ष विलास नलगे साहेब अहमदनगर,राजाराम गायकवाड साहेब प्रकल्प अंमलबजावणी कक्ष अहमदनगर,तालुका कृषी अधिकारी पदमनाथ म्हस्के,कृषी सहाय्यक विश्वास तोरडमल,आत्माचे कर्जत कर्जत तालुका प्रमुख श्री.बापूसाहेब होले,कर्जत तालुका शेतकरी फार्मर्स प्रोडूसर कंपनी कर्जत चे संचालक शरद म्हेत्रे,विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन सचिन भवर,निमगाव डाकूचे सरपंच शंकर शेंडकर,उपसरपंच रविंद्र कोठावळे त्याचबरोबर गावातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवस्पंदन फार्मर्स ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी चे संचालक केशव शिंदे यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कंपनी विषयी माहिती दिली.शेतकऱ्यांचा माल बाजार समितीच्या दरापेक्षा जास्त दरात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरून रोख स्वरूपात खरेदी करणार असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांना प्रत्येक अडचणींवर मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.
विलास नलगे साहेब यांनी शेती संबंधी उद्योगांविषयी माहिती दिली.त्यांनी शेती खर्च कमीत कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले.त्यांनी शेतकऱ्यांनी न परिस्थिती पाहून कमीत कमी पाणी वापर करून पिके घ्यावी असे सांगितले.
तालुका कृषी अधिकारी पदमनाथ म्हस्के साहेब यांनी तूर पिकावरील वांज, मर या रोगाविषयी मार्गदर्शन केले.तूर पिकाचे खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,रोग नियत्रंण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
त्या नंतर सर्व अधिकारी,शेतकरी तूर पीक पाहणी करण्यासाठी श्री.शहाजी भवर यांच्या शेतावर गेले..
तेथे गेल्यावर कृषी सहाय्यक श्री.विश्वास तोरडमल साहेब यांनी स्प्रे पंपाच्या साहाय्याने चालणाऱ्या मशीनने शेंडे खुडणी प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी दहिगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर कौशिक सर यांनी तुरीचे पीक पहिले आणि समाधान व्यक्त केले. यानंतर तुरीला लागणारे खत व्यवस्थापन व रोग नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच तुरीवर येणारे रोग व त्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली. शहाजी भवर यांचा तुरीचा प्लॉट पाहून समाधान व्यक्त केले.
यानंतर श्री शहाजी भवर यांनी तुरीचे पीक नियोजन,व्यवस्थापन कसे केले.याविषयी उपस्थित शेतकऱ्यांनी माहिती दिली.