कर्जतकरांसाठी सुवर्णसंधी : पोपटभाऊ कुलथे सराफ यांच्याकडून ‘आयबीजेए भाग्यलक्ष्मी फेस्टिव्हल स्कीम २०२५’ जाहीर


कर्जत (प्रतिनिधी): सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जत येथील ४८ वर्षांची विश्वासार्ह सुवर्णपेढी, पोपटभाऊ कुलथे सराफ (पीबीके ज्वेलर्स) यांनी ग्राहकांसाठी ‘आयबीजेए भाग्यलक्ष्मी फेस्टिव्हल स्कीम २०२५’ जाहीर केली आहे.
ही आकर्षक योजना २२ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार असून, या दरम्यान सोने व चांदी खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला केवळ आकर्षक भेटवस्तूच मिळणार नाही, तर आलिशान चारचाकी कार गाडीसह भव्य लकी ड्रॉमधील इतर मौल्यवान बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ग्राहकांना शून्य टक्का घट याचा लाभ मिळणार आहे. ही सुविधा ९१६ के हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांसाठी तसेच पीबीके चलनावर लागू राहील. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीची संपूर्ण किंमत मिळून खरेदीचा आनंद द्विगुणित होणार आहे.
याशिवाय, सोन्या-चांदीच्या खरेदीवर निश्चितपणे स्कूटर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा विविध भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. खास बाब म्हणजे या भव्य लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती ठेवलेल्या नाहीत. म्हणजेच, ठरावीक कालावधीत खरेदी करणारा प्रत्येक ग्राहक आपोआप लकी ड्रॉसाठी पात्र ठरणार आहे.

१९७८ पासून विश्वासार्हतेची परंपरा जपणारी ही सुवर्णपेढी कर्जतकरांसाठी ‘तुमची स्वप्नातील कार आमच्याकडे आहे’ असे आश्वासन देत आहे. सदगुरू कॉम्प्लेक्स, बाजारतळ, कर्जत येथे पीबीके ज्वेलर्सचे मुख्य आऊटलेट असून, पोपटभाऊ कुलथे सराफ यांनी ग्राहकांना ‘आजच भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या’ असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी ग्राहक ९०९४९४७८७८ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.



