रेहेकुरीत विद्यार्थ्यांनी साकारली इस्रोची प्रतिकृती..

कर्जत (प्रतिनिधी) : -कर्जत तालुक्यातील रेहेकुरी या ठिकाणी चांद्रयान 3 च्या यशस्वी landing नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम (RAWE & AIA) अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा रेहेकुरी येथील विद्यार्थ्यांकडून इस्रो ची प्रतिकृती सादर करून भारताचा गुणगौरव केला . यावेळी बहिरोबावाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.शाहाजी घुमरे सर शाळेचे प्राचार्य प्रा. लोंढे सर तसेच श्री.खराडे सर,श्री. मांडगे सर,श्रीम.रायकर मॅडम व श्रीम. कोठावळे मॅडम या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रणाली ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.हाळगाव कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या आश्लेषा डमरे, रोशना दुरगुडे, ऋतुजा गलांडे, प्रतीक्षा घनवट, प्रजाली गोसावी, अन्नपूर्णा हेळकर यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.