pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग
Trending

श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

Samrudhakarjat
4 6 1 5 9 6

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील ग्रामदैवत श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पाटील गल्ली येथील ध्यान मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त घरोघरी सडा, रांगोळी, तोरण व गुढी उभारून महाराजांच्या जन्माचे स्वागत केले. यावेळी हभप दयानंद महाराज कोरेगावकर यांचे हरिकीर्तन झाले. किर्तनानंतर महाआरती करण्यात आली. 

तब्बल पन्नास ते साठ हजार लिटर शिंपी आमटी, १०० पोते गव्हाच्या चपात्या अशा भव्य महाप्रसादाचे आयोजन करत कर्जत येथे श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा झाला. 

कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य पै. प्रवीण घुले पाटील यांनी गोदड महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवला. यानंतर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. आलेल्या सर्वांचे स्वागत करून आभार मानले. जन्मोत्सवानिमित्त तब्बल ५० ते ६० हजार लिटर शिपी आमटी बनवण्यात आली होती. शिंपी आमटीच्या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.

बारा वर्षांपासून परंपरा कायम ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांना शिपी आमटीचा महाप्रसाद देण्यात येतो. पै. प्रवीण घुले पाटील मित्र मंडळ, जन्मोत्सव समिती, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ यामध्ये सक्रिय सहभाग घेतात.

गेल्या बारा वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. शंभर भाविकांच्या प्रसादापासून ही परंपरा सुरू झाली होती, ती आता लाखो भाविकांच्या महाप्रसादापर्यंत पोहोचली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker