७६ वा भारतीय स्वतंत्र दिन राशीन मध्ये विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- भारतीय स्वतंत्र दिनाच्या ७६ व्या दिनानिमित्त राशीन येथे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, व ग्रामपंचायत कार्यालय राशीन यांच्या वतीने ठरलेल्या वेळेवर ध्वजारोहण माननीय लोकाभिमुख सरपंच नीलम साळवे यांच्या हस्ते करण्यात आले,
तसेच श्री जगदंबा विद्यालय राशीन या शाळेचे ध्वजारोहण माजी सरपंच शाहू राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तर हाशु अडवाणी विद्यालयातील ध्वजारोहण माजी सैनिक मेजर भास्कर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या ध्वजारोहणाच्या विविध कार्यक्रमा नंतर शासकीय सेवेत कौतुकास्पद काम करणाऱ्या माजी पदाधिकारी सेवकांना सन्मानचिन्ह देऊन सरपंच नीलम साळवे, राजेंद्र भैया देशमुख उपसरपंच शंकर देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यानंतर शहीद प्रदीप भोसले यांच्या कोण शिलेचे अनावरण मातोश्री कमल शंकरराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच नीलम साळवे. उपसरपंच शंकर देशमुख, राजेंद्र देशमुख, अल्लाउद्दीन काझी, शाहू राजे भोसले शहाजीराजे भोसले , ग्राम विकास अधिकारी कापरे, राम कानगुडे, अशोक जंजिरे, शिवकुमार सायकर, अतुल साळवे, रामकिसन साळवे तात्यासाहेब माने, शोएब काझी, साहिल काझी, सुभाष जाधव, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.