कर्जतमधील व्हीजन आय सेंटर येथे मधुमेहींचे डोळे तपासण्यासाठी अत्याधुनिक मशीनचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न.
महाराष्ट्रातील 32 व्हीजन सेंटरपैकी फक्त कर्जत येथेच पहिल्यांदा ही मशीन आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून बसवण्यात आली

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि एच. व्हि. देसाई हॉस्पिटल, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेहींच्या डोळे तपासणीसाठी कर्जत शहरातील व्हिजन आय सेंटर येथे नुकतीच नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक मशीनचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या डोळे तपासणीसाठी खास ‘ Fundus Machine for Diabetic Retinopathy Screening’ हे मशीन वापरण्यात येत आहे. ज्या नागरिकांना शुगरचा त्रास आहे, पडद्या वरती आलेले पांढरे स्पॉट, मोतीबिंदू होण्यापूर्वीची स्थिती ज्या कारणामुळे आपला डोळा निकामी होऊ शकतो त्या सर्व प्रकारच्या तपासण्या या मशिनद्वारे केल्या जातात. कर्जतमधील एच. व्हि. देसाई हॉस्पिटलमधे ही मशीन नागरिकांच्या सेवेसाठी ठेवण्यात आली आहे. यासाठी केवळ २० रुपये एवढे अत्यल्प शुल्क आकारून ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर मोतीबिंदू, लहान मुलांचे तिरळेपणाची शस्त्रक्रिया या सारख्या मोठ्या शस्त्रक्रिया अत्यल्प दरात केल्या जातात.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 32 व्हिजन सेंटर आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामधील एकमेक ठिकाणी म्हणजे कर्जतमध्येच आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ही आत्याधुनिक डोळे तपासणीसाठीची मशीन बसवण्यात आली आहे. कर्जत आणि जामखेडमधील 5000 हून अधिक नागरिकांनी आतापर्यंत व्हिजन सेंटर येथे तपासणी केली आहे. यामधून डोळ्यांशी सबंधित 1438 नागरिकांच्या शस्त्रक्रिया पुणे येथील एच. व्हि. देसाई हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या आहे. नागरिकांची तपासणी आणि पुढे शस्त्रक्रिया करायची झाल्यास तीही अतिशय माफक दरात केली जाते हे विशेष.
कर्जत-जामखेडमध्ये या अगोदरही आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून डोळ्यांची विविध शिबिरे घेण्यात आली आहेत. त्यामध्ये डोळे तपासणी करून लगेच चष्मे वाटप, तिरळेपणा शस्त्रक्रिया यासारख्या आजाराची शिबिरांमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करून उपचार करण्यात आले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एच. व्ही देसाई हॉस्पिटल, डी. वाय पाटील हॉस्पिटल, भारती विद्यापीठ यांच्या सहकार्यातून आतापर्यंत 3000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आता अत्याधुनिक मशीनद्वारे मधुमेहिंची तपासणी होणार असल्याने मतदारसंघातील मधुमेह असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय या माध्यमातून होणार आहे. तसेच डोळ्यांचे विविध आजार दुर्लक्षित होणार नाही.
– रोहित पवार
(आमदार कर्जत जामखेड विधानसभा)