यशोदानंद गोशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त लंम्पी काळात राशीन परिसरास उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल पशुवैद्यकीय अधिकारी डाँ. प्रेरणा सावळे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार.

राशिन (प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथील यशोदानंद गोशाळेस आज दोन वर्षे पूर्ण झाले वर्धापन दिनानिमित्त गोशाळेमध्ये हभप श्रीकांत महाराज पावणे यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते. तसेच लम्पि आजाराच्या काळामध्ये आपल्या राशीन परिसरात चांगल्या प्रकारे सेवा दिल्याबद्दल राशीन येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रेरणा सावळे यांचा गोशाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
राशीन ग्रामपंचायत सरपंच निलम साळवे व गोशाळा संचालिका आनंदीबाई राऊत यांच्या हस्ते डॉ सावळे यांना सन्मानचिन्ह व गोमातेची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर गोशाळेस मोफत पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉ.विलास राऊत यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.राशीन येथील प्रसिद्ध व्यापारी नवीन शेठ बोरा,डॉ राजकुमार आंधळकर , संजय शेठ बोरा, अप्पासाहेब नाळे,प्रितम शेठ शहा, हभप पावणे महाराज, मोती महाराज सोनवणे यांच्या हस्ते डॉ राऊत यांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी राजकीय, सामजिक ,धार्मिक क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.