१० व्या ‘विद्यार्थी आणि शिक्षक’ साहित्य संमेलनाच्या ‘संमेलनाध्यक्षपदी’ प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांची निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालयाचा मराठी विभाग व राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त ९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘क्रांतिदिनी’ १० वे ‘विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन’ दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील ‘शारदाबाई पवार सभागृह’ येथे आयोजित केले आहे.
या विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, माजी संमेलनाध्यक्ष प्रख्यात कादंबरीकार शंकर आथरे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे, डॉ. बंडोपंत कांबळे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. सुखदेव कोल्हे, प्रा.स्वप्नील म्हस्के, प्रा. अक्षय मंडलिक उपस्थित होते.