राशीन जवळील गैबीसाहेब दर्गा मुजावर वर अज्ञात दोन तरुण चोरट्यांचा हल्ला रक्कम घेऊन लंपास.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन नजीक दोन किलोमीटरवर दौंड उस्मानाबाद राज्यमार्गावर आज सकाळी नऊच्या सुमारास गैबी साहेब पीर दर्ग्यावर नेहमीप्रमाणे दर्ग्याचे मुजावर निसार बनेमिया काझी. वय (८०) राहणार राशीन दर्गा आवारात बसले होते अचानक राशीनच्या दिशेने दुचाकी वाहनावर दोघेजण आले. त्यांनी दर्गा बाहेर बसलेल्या निसार बनेमीया काझी यांना बेछूट मारहाण करून खिशातील रुपये पाच हजार काढून घेतले या झटापटीमध्ये निसार काझी यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे .या घटने वेळी तेथे कोणी नसल्यामुळे मोटार सायकलवर आलेली दोघे चिलवडीच्या दिशेने रवाना झाले. या घटनेची माहिती रस्त्यावरील नागरिकांना कळता चोरट्यांचा पाठलाग केला परंतु अज्ञात चोरटे सापडले नाही त्या दोन्हींचे वय अंदाजे पंचवीस तीस वर्ष असून एकाने काळा शर्ट तर दुसऱ्याने पांढरा शर्ट घातला होता.
या घटनेनंतर सदर इसमाने राशीन पोलीस स्टेशनकङे धाव घेतली मात्र तेथे त्यांची दखल (तक्रार )न घेता नंतर या येथे कोणी नाही असे सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टर राजकुमार आंधळकर यांच्या दवाखान्यात उपचार चालू आहेत. अशा घटना घडतात यावेळी पोलीस स्टेशनला कोणीच नसते असे अनेक वेळा यामागेही बघावयास मिळाले आहे. मटका जुगार दारू, इतर अवैद्य धंद्यावर पोलिसांची करडी नजर पहावयास मिळते कारण तेथून काही चिरीमिरी मिळते ना! मग वय वृद्धाची दखल कोण घेणार. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा घटनेकडे लक्ष केंद्रित करावे तसेच गुरुवार रोजी गैबीसाहेब पिराचा उरुस आहे.
या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, लहान मुले मुली व इतर नागरिक दर्शनासाठी येतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलाने पावले उचलावीत अन्यथा असे चोरीचे प्रकार घडवू शकतात हे नक्कीच.