नवरात्र उत्सव दरम्यान नियोजनबद्ध चोख बंदोबस्त ठेवल्याने राशिन शिवसेनेच्या वतीने तालुका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

राशिन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सव व पालखी यात्रा दरम्यान प्रशासकीय अधिकारी तहसीलदार गणेश जगदाळे,तसेच डीवायएसपी विवेकानंद वाखारे यांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्त मुळे जगदंबा देवी दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना रांगेत उभे राहून सुलभ दर्शन घेता आले. तसेच पालखी सोहळा यात्रे दरम्यान देखील कडेकोट व चोख बंदोबस्त ठेवल्याने पालखी सोहळ्या दिवशी देखील भावी भक्तांना देवीचे मुखदर्शन सुलभ झाले .व यात्रा मोठ्या उत्साहात खेळीमेळीत पार पडल्याने राशीन शहर शिंदे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार साहेब गणेश जगदाळे, डीवायएसपी विवेकानंद वाखारे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता वाघमारे साहेब, तसेच कर्मचारी शकील भाई शेख, यांचा देवीचा लॅमिनेशन फोटो, भगवीशाल, श्रीफळ देऊन तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, भाजपा नेते अंबादास पिसाळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. शबनम इमानदार, तालुका युवा सेना प्रमुख सोमनाथ शिंदे, जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, तालुका उपप्रमुख वृषभ परदेशी, राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे, युवा सेना शहर प्रमुख योगेश भवर, पंचायत समिती गणप्रमुख पै. गणेश मोढळे, उपशहर प्रमुख मच्छिंद्र सुद्रिक, आधी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.