दादा पाटील महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांची पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभामध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पोलीसपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शितल देवकाते, प्रवीण ढगे, प्रवीण चव्हाण, कोमल गरड, ऋषिकेश गोरे, वर्षा गिरमे, हरीओम कदम, किशोर बटुळे, किरण दंडे, दत्तात्रय थोरवे, अजित निकत आदि विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाकरिता रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्र तात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बाळासाहेब साळुंके, तात्यासाहेब ढेरे, महादेव तांदळे, अमित तोरडमल, सागर लाळगे, प्रशांत गायकवाड,पत्रकार गणेश जेवरे आदि मान्यवर व महाविद्यालयाच्या प्रशासकीय सेवक आणि आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
महाविद्यालयाचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विभाग, एनसीसी विभाग व पॅरा मिलिटरी विभाग व विविध बौद्धिक सत्रांच्या माध्यमातून जे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जातात, त्याचा फायदा पोलीसपदी निवड झालेल्या १४ विद्यार्थ्यांना मिळाल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी नमूद केले.