९ ऑगस्ट रोजी दादा पाटील महाविद्यालयात दहाव्या ‘विद्यार्थी आणि शिक्षक’ साहित्य संमेलनाचे आयोजन.

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील मराठी विभाग व राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने दादा पाटील महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त ९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘क्रांतिदिनी’ १० वे ‘विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन’ दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील ‘शारदाबाई पवार सभागृह’ येथे आयोजित केले आहे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेंद्रतात्या फाळके यांची निवड झाली असून संमेलनाचे उद्घाटन प्रा. शंकर आथरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय नगरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, प्रमुख अतिथी म्हणून बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळच्या सत्रात सकाळी ९ वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व शिक्षक, विद्यार्थी यांच्या समवेत ‘आम्ही भारतीय अस्मिता दर्शन यात्रा’ काढण्यात येईल. सकाळी दहा वाजता या संमेलनाचा उद्घाटन समारंभ संपन्न होईल.
दुसऱ्या सत्रात कवयित्री संगीता झिंजूरके यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यपंढरी’ हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम संपन्न होईल. या कवी संमेलनामध्ये गुलाबराजा फुलमाळी (नेवासा), डॉ. सुशील सातपुते (लातूर), रवींद्र यशवंतराव (मुरबाड), सुनिता कपाळे (छ. संभाजीनगर), पंडित निंबाळकर (कोपरगाव), विद्या जाधव (अहमदनगर), वीणा व्होरा (पंढरपूर), विजय माळी (धुळे), दीपक नागरे (वाशिम), सीमाराणी बागुल (नाशिक), उज्वला जाधव (कर्जत), स्वाती पाटील (कर्जत) हे कवी सहभागी होणार आहेत.
कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार रोहितदादा पवार यांना राष्ट्रीय बंधुचा साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ या संमेलनामध्ये दिला जाणार आहे. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. प्रदीप कदम यांना दिला जाणार आहे. तसेच सचिन शिंदे (उमरखेड), डॉ. जतीनबोस काजळे (जामखेड), संतोष शेळके (नेरळ), मारुतराव वाघमोडे (रेहेकुरी), विजयकुमार पांचाळ (नांदेड), नारायण सोनावणे (कोपरगाव), रोहिदास शिखरे (छ. संभाजीनगर), संदीप राठोड (निघोज), सचिन चव्हाण (पाथर्डी), हनुमंत घाडगे (बीड), राजू भाऊसाहेब पाडेकर (अहमदनगर) यांना ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ वितरित केला जाणार आहे.
साहित्य, कला व सामाजिक आदि क्षेत्रात काम करणाऱ्या ११ शिक्षकांना ‘राष्ट्रीय बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार’ व ११ विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ याच संमेलनात देण्यात येणार आहे.
दहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील विविध शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच साहित्य रसिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, संमेलनाध्यक्ष व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, व संमेलनाचे निमंत्रक प्रा. प्रशांत रोकडे व प्रा. सुखदेव कोल्हे यांनी केले आहे.