pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

धुळे येथे नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडाळाची बैठक संपन्न

Samrudhakarjat
4 6 3 1 0 3

कर्जत:- नाशिक विभागीय ग्रंथालय संघ कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे परदेशी फार्म हाऊस या ठिकाणी पार पडली या मीटिंगच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे कार्यअध्यक्ष तथा मालेगाव येथील नामांकित वकील मा•ऍड• अजय शहा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व या बैठकीचे आयोजक मा•दत्ताजी परदेशी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक मा•पनाजी कदम या मिटिंगला उपस्थित होते या वेळी सर्व उपस्थित मंडळीचे स्वागत मा•अशोक भदाणे यांनी केले तर अध्यक्षीय सुचना नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे मुख्य कार्यवाह मा• ऍड•प्रवीण पाटील यांनी माडंली या वेळी नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यातील संचालक उपस्थित होते

ही मिटिंग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व पारदर्शी पणे पार पडली या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदे वर मा•दत्ताजी परदेशी यांची तर महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती वर मा•सतिष पाटील यांची निवड झाल्या बद्दल तसेच डॉ• राहुल मेहिरे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथ मित्र पुरस्कार मिळाल्या बद्दल तिघांनाही शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले या मिटिंग मध्ये नाशिक विभाग ग्रंथालय संघाच्या आज वरच्या कामाचा लेखाजोखा तसेच नाशिक विभाग ग्रंथालय संघाच्या भविष्यातील कालबद्ध पद्धतीच्या योजना तसेच नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या पुढील कामकाजा बद्दलचा आढावा मा•दत्ताजी परदेशी यांनी माडंला तसेच नाशिक विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशन आयोजना बाबतचा तसचे नाशिक विभाग ग्रंथालय संघाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबींच्या पूर्तते बाबतचा चा पाठपुरावा करून नाशिक विभाग सक्षम करून भविष्यात ग्रंथालय चळवळीत दिशा दायक काम करून नाशिक विभाग ग्रंथालय संघाच्या कामाचा आलेख उंचवण्या साठीचा ठराव या वेळी सर्वांनुमते संमत करण्यात आला या वेळी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून एकमताने मंजूर करण्यात आले या वेळी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा•सतिष पाटील, संजय पाटील, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह ऍड• प्रवीण पाटील, रमाकांत पाटील, रोहिदास हाके, राहुल मेहीर, मोहन पिगंळे, राजेश शिरसाठ, शांताराम जाधव, गणेश देशमुख, अरुण मोरे सुधीर साळुंखे सौ• कविता पाटील, सुभाष वळवी, जगदीश तडवी, तसेच अहिल्या नगर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे संचालक विष्णुपंत पवार तसेच अहिल्या नगर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह तथा नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे संचालक ऍड•आजिनाथ जायभाय, अहिल्या नगर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा महाराष्ट्राचे ग्रंथालय संघाचे संचालक पनाजी कदम इ• उपस्थित होते तर या बैठकी साठी उपस्थितांचे आभार अनिल सोनवणे यांनी मानले तर या पुढे भविष्यात नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे काम अतिशय दमदारपणे आणि चोखपणे केले जाईल असा विश्वास ऍड• प्रवीण पाटील आणि सतीश पाटील सर यांनी उपस्थितानां दिले…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker