विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी ठेकेदार वायरमन यांच्या मिलीभगतमुळे काम निष्कृष्ट दर्जाचे :- पै. शाम कानगुडे.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथील वार्ड क्रमांक दोन मधील गवळरान सायकर वस्ती विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठेकेदार कडून सिंगल फेज चे १४ लाख रुपये मंजुरीचे काम एक महिन्यापासून चालू झाले असून आतापर्यंत फक्त पोल उभारण्यात आले आहेत परंतु पाेलचा घेतलेला पाया मजबूत नसल्यामुळे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे बरेच पाेल जमीनधाेस्त झाले आहे, ठरलेल्या इस्टिमेटप्रमाणे पोलच्या पायाचे मजबूतीकरन न झाल्यामुळे तसेच कमी प्रमाणात खोदकाम करून पाेल राेवल्यामुळे हा प्रकार घडला असावा तसेच या कामात अधिकारी कॉन्ट्रॅक्टर वायरमन यांची मिली भगत असल्यामुळे असे निष्कृष्ट कामे होतात असे कानगुडे यांनी सांगितले. तसेच तोंड बघून सर्वे करणे ठराविक वस्त्या जाणून बुजून गाळणे, हायमॅक्स पथदिवे कॉन्ट्रॅक्टर ने बसून गेल्यानंतर लाईट बंद पडल्यास रिपेरिंग मेंटनस संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून होत नाही.
लाईट वारंवार जाणे लाईट गेल्यानंतर विद्युत पुरवठा तासंतास पूर्ववत न होणे, वेळेवर फोन न उचलणे अशा अनेक समस्यां सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे. यावर त्वरित नियंत्रण घालावे तसेच गवळ रान सायकर वस्ती येथील पोल सक्षम परत उभा करून सिंगल फेज लाईट त्वरित चालू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पै. श्याम कानगुडे यांनी दिला आहे.