राशीन मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती राशीन येथे महात्मा ज्योतिबा फुले चौकात मोठ्या उत्साहात फटाकड्याची आतीष बाजी करीत साजरी करण्यात आली,
याप्रसंगी राशीन च्या लोकाभिमुख सरपंच नीलम भीमराव साळवे , उपसरपंच शंकर देशमुख तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी युवा नेते राजेंद्र देशमुख, शाहू राजे भोसले, पै. रवींद्र दामोदर ग्रामपंचायत सदस्य युवराज सिंह राजे भोसले, विक्रम सिंह राजे भोसले ,राम कानगुडे, अशोक जंजिरे, शिवकुमार सायकर, स्वप्निल मोढळे, दीपक थोरात ,भाजपा शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, बापू धोंडे, गणेश कदम, रामकिसन साळवे, परीट वाडीचे सरपंच विलास काळे, मकरंद राऊत, राजेंद्र राऊत, माऊली सायकर, सागडे भाऊसाहेब इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.