शिवसेनेच्या(मुख्यमंत्री शिंदे गट) महिला आघाडी तालुका प्रमुखपदी डॉ शबनम इनामदार यांची नियुक्ती

कर्जत प्रतिनिधी : – कर्जत शिवसेनेच्या(मुख्यमंत्री शिंदे गट) महिला आघाडी तालुका प्रमुखपदी डॉ शबनम इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली. सदर निवडीचे पत्र दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी नुकतेच प्रदान केले. डॉ इनामदार यांच्या निवडीचे राजकीय क्षेत्रातून स्वागत होत आहे.
कर्जत तालुका शिवसेनाच्या (मुख्यमंत्री शिंदे गट) महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षापदी कर्जतच्या डॉ शबनम इनामदार यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी केली. यापूर्वी डॉ इनामदार यांनी महिला आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. मागील महिन्यातच मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे आणि निवडक मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती दिल्याने निश्चित नव्या जबाबदारीस आणि तालुक्यात पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल असा विश्वास शबनम इनामदार यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे शिवसेना तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केले.