दुरगाव ग्रामस्थांच्या वतीने नूतन भाजपा अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

राशीन ( प्रतिनिधी (जावेद काझी) :- भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक नवनिर्वाचित पदाधिकारी फारुख भाई पठाण अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष , अल्ताफ गुलाब शेख प्रदेश सदस्य, लतीफ बाबूलाल शेख सरचिटणीस , सद्दाम शेख सोशल मीडिया अध्यक्ष थेरगाव , रियाज शेख कोषाध्यक्ष, जमीर काझी राशीन शहराध्यक्ष, जमीर शेख तालुका उपाध्यक्ष, मोहम्मद शेख चिटणीस यांचा सत्कार दुरगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय दुरगाव येथे करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक साहिल दादा काझी यांनी भाजपा पक्षाने ठरवलेल्या ध्येय धोरणाबाबत माहिती देत येणाऱ्या लोकसभा विधानसभा व ग्रामपंचायत निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर काम कसे करायचे याबाबत अल्पसंख्यांक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना. माहिती देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा नेते माणिक जायभाय, साहिल काझी,अल्ताफ भाई शेख, जाकीर भाई शेख,अतिश धोडके , पत्रकार विजय सोनवणे, मा.सरपच सोमनाथ वाघमारे खेड, दुरगाव येथील युवक नेते असलम शेख यांची भाजपा अल्पसंख्यांक तालुका चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल यांचा देखील सत्कार दुरगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.