माजी सरपंच बाळासाहेब लोंढे यांची IMC व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्यपदी नियुक्ती

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव गावचे माजी सरपंच बाळासाहेब विश्वनाथ लोंढे यांची राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कर्जतच्या IMC (Institute Management Committee) व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची व नेतृत्वगुणांची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालयाचे मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी IMC व्यवस्थापन समितीची यादी नुकतीच जाहीर केली. त्या यादीत बाळासाहेब लोंढे यांचा समावेश आहे.
बाळासाहेब लोंढे हे मागील तीन दशकांपासून सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत. ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, शेतकरी आणि युवकांच्या प्रगतीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
अंबिजळगाव ग्रामपंचायतीत तीन वेळा सदस्य आणि पाच वर्षे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
त्यांच्या कार्यकाळात गावात महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात आली आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे.
ITI कर्जतच्या IMC व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्यपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, बाळासाहेब लोंढे औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रात सुधारणा आणि युवकांना रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी कार्य करतील.
त्यांच्या नेतृत्वाखाली –
✔ औद्योगिक क्षेत्राशी संबंधित धोरणे ठरवणे
✔ अभ्यासक्रम सुधारणा व कौशल्यविकास उपक्रम राबवणे
✔ विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे
या बाबींवर भर दिला जाईल. स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संधी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बाळासाहेब लोंढे यांच्या निवडीमुळे कर्जत तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अंबिजळगाव ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.
या निवडीमुळे कर्जत तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्यविकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कर्जत तालुक्यात माझी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण दादा घुले पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी सरपंच आंबीजळगाव बाळासाहेब विश्वनाथ लोंढे
या वेळी उपस्थित मान्यवर या नियुक्तीच्या वेळी मा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह चंद्रकांत काळोखे आणि सचिन भारस्कर व कार्यकर्ते उपस्थित होते.