राशिन ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी व पदाधिकारी यांनी केलेल्या बेकायदेशीर कारभाराची सखोल चौकशी होऊन कठोर कार्यवाही व्हावी: रवींद्र दामोदरे.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- राशिन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात अनियमितता दिसून येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी होऊन त्या कामाची दप्तरी तपासणी होऊन तसेच शासनाच्या 14 व्या व १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतला आलेल्या कोट्यावधी रुपयाच्या निधीतून ग्रामपंचायतने केलेल्या कामातही अनियमितता दिसून येत असल्यामुळे सदर झालेल्या कामाची चौकशी होऊन दप्तरी तपासणी व्हावी तसेच राशिन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी सन २०१४ ते दि. ८.३.२०२३ अखेर पर्यंत ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यकाळात ग्राम सेवकांनी कार्यालयीन वेळ न पाळणे, रात्री अप रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत कार्यालय सुरू ठेवणे, ग्रामपंचायत कार्यालय मध्ये काही कर्मचाऱ्यांसोबत मद्य पान करणे, तसेच ग्रामपंचायतच्या विविध कर भरूनही तागदा लावणे, विविध कर पैसे भरून देखील ग्रामस्थांना पावती न देणे, घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक फसवणूक करून पिळवणूक करून अपमानित करणे, गलिच्छ भाषेचा वापर करून वेळ प्रसंगी शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देणे, तसेच एखाद्या सामान्य नागरिकांनी घरकुलाचे पैसे आले किंवा नाही विचारणा केली असता घरपट्टी पाणीपट्टी भरण्याचा धाक दाखवणे अशी विचारणा ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी व पदाधिकारी यांना केल्यास त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, असे अनेक प्रकार गेल्या पाच वर्षा पासून राशीन ग्रामपंचायत मध्ये घडतायेत, याची सखोल चौकशी होऊन ग्रामविकास अधिकारी पदाधिकारी काही कर्मचारी सोनटक्के यांची चौकशी होऊन संबंधितांचे मोबाईल कॉल डिटेल्स, रेकॉर्डिंग, मोबाईल डाटा तपासणी व्हावी. राशीन येथील ऐतिहासिक वास्तूच्या जागेवर पक्की बांधकामे करणाऱ्या अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे काय याचाही लेखी खुलासा मिळावा राशीन गावात नऊ ठिकाणी ऐतिहासिक देवळे वेशी , बारव आहेत
या मंदिराचे व वेशीचे जतन करण्याचे काम पूर्वतन विभागाकडे आहे परंतु अशा ठिकाणी देखील ग्रामपंचायत मालकीच्या जागेतही ऐतिहासिक वस्तू असून त्याच्यावर देखील पक्की घरे बांधलेली आहेत, असे असताना ग्रामपंचायत गप्प का याचाच अर्थ ग्रामविकास अधिकारी व पदाधिकारी यांच्या संगमताने वास्तुवर बांधकाम करण्याची परवानगी दिली जाते ही वस्तुस्थिती आहे
या समस्या बाबतचे निवेदन रवींद्र दामोदर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत यांना निवेदन द्वारे बेकायदेशीर कारभाराची सखोल चौकशी होऊन कर्मचारी सोनटक्के यांची नार्को टेस्ट होऊन दोषीवर योग्य ती कारवाई तात्काळ करावी व सदर कार्यवाहीच्या अहवालाची प्रत पंधरा दिवसाच्या आत मला मिळावी असे लेखी निवेदन रवींद्र दामोदर यांच्या वतीने देण्यात आले आहे.