उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस निवासस्थानांचे लोकार्पण

कर्जत, (प्रतिनिधी) :- कर्जत येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी कर्जत येथे झाले. जामखेड येथील ३८ निवासस्थानांचे कर्जत येथून ऑनलाईन लोकार्पण केले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ. राम शिंदे, पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कर्यकारी अधिकारी आशिष येरेकर,
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
फडणवीस यांनी यावेळी कर्जत येथील या नवीन पोलीस निवासस्थांनाची पाहणी केली. पोलीस कर्मचारी व बँड पथकातील कर्मचाऱ्यांशी संवाद
साधला.
कर्जत येथे ३०२३.१५ व जामखेड येथे २९९६. ३१ चौरस मीटर मध्ये पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी ७६ निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. १५ कोटी २१ लाख रुपये खर्चून बांधण्यात आली आहेत.