गोळीबार प्रकरणाला वेगळेच वळण

कर्जत (प्रतिनिधी) :- कोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुरकुटवाडी येथील गोळीबाराच्या घटनेला आता वेगळे वळण मिळाली आहे. ज्यांच्यावर गोळी मारण्याचा आरोप करण्यात आला असे विनोद मुरकुटे यांनी असा दावा केला आहे की, प्रमोद विजय आतार याने स्वतःहून पायाला गोळी मारून घेतली आहे व खोट्या गुन्ह्यामध्ये आपल्याला अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. मात्र प्रशासनाने व्यवस्थित चौकशी केल्यास सर्व सत्य समोर येईल.विनोद मुरकुटे यांनी पुढे सांगितले की,कर्जत तालुक्यातील मुरकुटवाडी येथे शेतकऱ्यांचे ऊस कारखान्यांना पाठवण्याचे काम सुरू आहे. माझी स्वतःची ही ऊस तोडणीची एक टोळी आहे. त्यानुसार त्या परिसरामध्ये ऊस तोडणीचे काम सुरू आहे. शेतामध्ये मोठ्या संख्येने ऊस तोडणी कामगार आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली असा दावा आतार करत आहेत त्या ठिकाणी मी नव्हतो. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच मला एका जणांनी फोन करून आतार यांनी तुझे नाव घेऊन तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार दिली आहे असे सांगितले.