शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचे उत्साहात प्रारंभ

कर्जत, (प्रतिनिधी) : – येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार संपर्क कार्यालयाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी पक्षचिन्ह तुतारीचे अनावरण करण्यात आले. आम्ही सदैव ज्येष्ठ नेते शरद पवरा यांच्या बरोबर, अशी शपथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली.
नगराध्यक्ष उषा राऊत, गटनेते संतोष म्हेत्रे, उपगट नेते प्रा. सतीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे व रघुनाथ काळदाते, शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, महिला आघाडीच्या माधुरी पाटील, नगरसेविका प्रतिभा भैलुमे व हर्षदा काळदाते, सरपंच पूजा सूर्यवंशी, नितीन धांडे, सुनील शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
देशाचे नेते शरद पवार हा विचार आहे, जो कधीच संपू शकत नाही. तो विचार संपण्याचा विचार करणारे संपले. त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार रोहित पवार यांच्या
समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार देशात आणि राज्यात पुन्हा उभारी घेईल. शहर, गावे, वाड्या-वस्त्या एवढेच काय, सर्वांच्या हृदयातून तुतारी वाजेल आणि इतिहास घडवेल, अशा भावना यावेळी वक्त्यांनी मांडल्या.