कोळगावथडी येथील पवित्र कुराण विटंबना प्रकरणी आरोपींनवर कारवाईसह गुन्हा दाखल करा: कर्जत तालुका सकल मुस्लिम समाजाचे निवेदन.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी नजिक कोळगाव थडी येथील मज्जिद मध्ये घुसून अज्ञात समाजकंटकांनी मुस्लिम समाजातील पवित्र अशा कुराण ग्रंथाची विटंबना केली या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी अकरा वाजता कर्जत तालुकातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कर्जत चे तहसीलदार साहेब श्री गणेश जगदाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग श्री विवेकानंद वाखारे साहेब तसेच डीवायएसपी/ पी आय अरुण पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे व सदर घटनेची गांभीर्य ओळखून लवकरात लवकर अपराधींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्जत तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार जावेद काझी, रायटर चे संपादक आसिफ खान, राष्ट्रवादीचे फिरोज खान, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शोएब काझी, साहिल काझी, जमीर काझी ,माजिद भाई पठाण, जुनेद सय्यद, आफताब सय्यद, युसुफ पठाण, नाजिम पठाण, अश्रफ तांबोळी, हाफिज अब्जल, सोहेल कुरेश, नौशाद काझी, आसिफ बागवान, राजू पठाण, जोयब काझी, समीर मुलानी, शाहरुख पठाण, राजू भाई शेख, सद्दाम काझी, इतर कर्जत तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.