राशिन मधील मातंग वस्तीतील रस्त्यावर गटारीच्या दुर्गंधी पाण्याचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्यास धोका.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- एकीकडे भारत देश स्वातंत्रेचा 77 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे .मात्र अजूनही देशातील जनता अन्न, वस्त्र, निवारा ,रस्ते, वीज, रेशन कार्ड या मूलभूत प्रश्नांवर संघर्ष करताना दिसत असून यामध्ये कुठेतरी सिस्टीमचा दोष पहावयास मिळत आहे. असाच प्रकार राशिन मधील मातंग वस्तीमध्ये सध्या बघावयास मिळत आहे. चक्क गटारीच्या ड्रेनेजचे 💦 दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर जमा होऊन पिण्याच्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये देखील जमा झालेले दिसून येत आहे. या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे तेथील रहिवासी यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. रहिवाशांच्या मते ग्रामपंचायत मध्ये अनेक वेळा सांगून देखील या दुर्गंधी पाण्याचा निचरा होऊ शकला नाही तेथील नागरिकांना दुर्गंधी पाण्यातून रोज वाट काढावी लागत आहे. तरी लवकरात लवकर दुर्गंधी पाण्यापासून आमची मुक्तता करावी अन्यथा या समस्येबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा एल्गार महिला वर्गाने दर्शवला आहे.
तसेच 95 वयाची वयाेवृद्ध आंजी चांगुना बाबा उकिरडे अद्याप घरकुला पासून वंचित आहे. परंतु अद्याप घरकुल मिळत नसल्याने संघर्षमय जीवन जगत आहे. तरी लवकरात लवकर राशिन ग्रामपंचायती च्या सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी रस्त्यावर आलेल्या दुर्गंधी पाण्याची त्वरित शहानिशा करून मातंग वस्ती तील गटाररीचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे अशोक जंजिरे यांनी दिला आहे.