ब्रेकिंग
कर्जतमध्ये भीषण अपघात ; १ ठार, एक जखमी

Samrudhakarjat
4
0
3
3
3
1
कर्जत (प्रतिनिधी) : – कुळधरण मार्गावर आज शुक्रवारी (दि.३) रात्री सात वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. वडगाव तनपुरा जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.
अशोक निवृत्ती तोरडमल, वय :४०, रा. शिंदेवाडी, ता. कर्जत असे मयत झालेल्याव्यक्तीचे नाव आहे. मेहराज पठाण यांच्यारुग्णवाहिकेतून मयताला कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसऱ्या दुचाकीवरील जखमीचे नाव गुड्डू मोहिते, वय : २२,रा. थोटेवाडी असे आहे. तो दारूच्या नशेत आहे.त्याला कर्जत येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती मेहराज पठाण यांनी दिली.