जिल्हा बँक प्रथम शेतकऱ्यांचे हित पाहते, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या बँकेचे काम चालते : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कर्जत (प्रतिनिधी) : – जिल्हा बँक ही आशिया खंडातील अग्रगण्य बँक म्हणून 9 हजार कोटीच्या ठेवी या बँकेत आहेत, बँक प्रथम शेतकऱ्यांचे हित पाहते, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या बँकेचे काम चालते तसेच
जिल्हा बॅंकेच्या कामकाजात कर्डीले यांनी परिवर्तन आणले आहे, ते नियोजनपूर्वक काम करत आहेत. असे प्रतिपादन महसूलमंत्री, दुग्धविकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले, ते कर्जत येथे अहमदनगर जिल्हा बँकेच्या कर्जत शाखेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
नूतन इमारतीचे उद्घाटन महसूलमंत्री, दुग्धविकास व पशुसंवर्धन तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले होते, यावेळी माजी मंत्री आ. राम शिंदे, संचालिका आशाताई तापकीर, संचालक अंबादास पिसाळ, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, संचालक मंडळ बाळासाहेब साळुंके, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके ,भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, अशोक खेडकर,दादासाहेब सोनमाळी,दूध संघाचे चेअरमन शंकर देशमुख,दिग्विजय देशमुख तालुका विकास अधिकारी बाळासाहेब ढेरे, मोहन गोडसे,
अल्लाउद्दिन काझी, बिभीषण गायकवाड, संजय भैलुमे, मंगेश जगताप, विनोद दळवी, काकासाहेब धांडे, प्रतिभा रेणुकर,
जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनील यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष ऍड बाळासाहेब शिंदे, आदींसह मान्यवर, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विखे पुढे बोलताना म्हणाले की, सहकारी संस्थांच्या पुढे अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, एखादी संस्था बुडाली त्यापेक्षा लोकांचा सहकारी संस्थांवरचा विश्वास उडाला तर या संस्थाकडे शेतकरी पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत, निवडणूका आल्या की आपल्याला वाटत कर्जमाफी झाली पाहिजे पण 40 हजार कोटी रुपये वाटून सुद्धा अजून लोकांचे कर्ज रक्कम देने बाकी आहे, काही लोक कर्ज घेतल्यानंतर सोसायटीकडे फिरकत नाहीत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डीले यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्हा बँक म्हणजे शेतकऱ्यांची बँक आहे, अशी देशात बँकेची ओळख आहे, जुन्या लोकांनी बँकेची स्थापना केली , स्थापना केल्यापासून शेतकऱ्यांची प्रगती झालेली दिसत आहे, पिकासाठी, पाईपलाईन साठी, जनावरांसाठी कर्ज बँकेमार्फत दिले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगत झाली आहे, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्या कर्जवसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, मार्च अखेरीस कर्ज भरले नाही तर त्या कर्जस ११ टक्के व्याज लागणार आहे. आता निवडणूक आहे, मग शासन कर्ज माफ करेल असे अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे, मात्र कर्ज माफी करण्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचे याबाबत कोणतेही नियोजन नाही, त्यामुळे मार्च अखेरीस सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे आवाहन कर्डीले यांनी केले.
आ राम शिंदे म्हणाले एक रुपयात पीक विमा, पंतप्रधान शेतकरी किसान सन्मान योजना सरकारने प्रभावीपणे राबविली आहे, ११ टक्के व्याजाच्या बाबतीत राज्य सरकारने तातडीने याबाबत निर्णय घ्यायला हवा. जो नियमित कर्ज भरतोय त्याचे प्रोत्साहन पर अनुदान रखडले आहे. तसेच यावेळी कुकडीचे आवर्तन सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळाले आहे ,अंबादास पिसाळ हे गेले तीन टर्म झाले एका मताने निवडून आले आहेत, तालुक्याला तीन संचालक आहेत, 65 वर्षात जिल्हा बँकेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला नव्हता, त्यामुळे कर्डीले साहेबांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत.
सहकार महर्षी बाळासाहेब पाटील दूध संघासाठी जागा दिल्याबद्दल व दुधाला पाच टक्के अनुदान दिल्याबद्दल दूध संघाचे चेअरमन शंकर देशमुख यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित सर्वांचे काकासाहेब तापकीर यांनी आभार मानले.