मा.आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राशिन येथील जि.प. प्राथमिक शाळा व जगदंबा विद्यालयास संगणक संच भेट.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राशिन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री जगदंबा विद्यालयास प्रमुख उपस्थित मान्यवर प्रा. इनामदार सर व प्रा. गुंजाळ सर यांच्या हस्ते संगणक वस्तू संच भेट देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संगणकीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढस वाव मिळावा व शहरी भागा सारखे अत्याधुनिक प्रणालीचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून घेता यावे. याच हेतूने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सत्यजित तांबे त्यांनी संगणक संच भेट दिला आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले. यावेळी राशिन ग्रामपंचायत उपसरपंच शंकर देशमुख, ज्योतीराम काळे, अविनाश मासाळ, ओंकार कानगुडे, सद्दाम काझी, दीपक थोरात, खंडागळे सर, वावगे सर, साळवे सर,खेडकर सर, कोपनर सर, शिंदे सर, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.