दादा पाटील महाविद्यालयाच्या कलावंत विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे कला व क्रीडा महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘शिवजन्म ते शिवस्वराज्याभिषेक’ महानाट्य सोहळ्याचे सादरीकरण सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. या महानाट्यमध्ये सांस्कृतिक विभागातील जवळपास ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. रोमहर्षक अशा त्यांच्या अदाकारीने हजारो प्रेक्षक विद्यार्थी व पालक, माजी विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या महानाट्यामध्ये शिवचरित्रामधील ‘महाराष्ट्रात पसरलेले अंधारयुग, शिवजन्म, जिजाऊ व शहाजीराजांकडून मिळालेले संस्कार, कडक शासनाची अंमलबजावणी, तोरणा कोंढाणा किल्ला जिंकला, स्वराज्याचे तोरण, अफजलखान वध, लाल महाल व शाहिस्तेखानावरील हल्ला, आग्रा प्रसंग, तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील प्रसंग, अनेक पराक्रमी लढाया, शिरकाई देवीचा राजगडावरती गोंधळ, शिवरायांचा राज्याभिषेक आदि शिवपराक्रमावरील प्रसंग महाविद्यालयातील कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केले.
या महानाट्याची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांची होती. तसेच या महानाट्याचे दिग्दर्शन अकबर शेख व रिकुल सोनी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले
या महानाट्याच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी तसेच प्रा. स्वप्नील म्हस्के, प्रा. बाळासाहेब धांडे, प्रा. राम काळे, प्रा. वृद्धेश्वर गरुड, प्रा. कीर्ता वसावे, डॉ. बेबी खिलारे, डॉ. प्रतिमा पवार, प्रा. मीना खेतमाळीस, डॉ. भारती काळे, प्रा. शिल्पा तोडमल, प्रा. तृप्ती निंभोरे, प्रा. सुवर्णा गायकवाड या प्राध्यापकांनी व सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बाळासाहेब साळुंके, दीपकशेठ शिंदे, विशाल म्हेत्रे, पत्रकार गणेश जेवरे, विजय तोरडमल, भाऊसाहेब रानमाळ, सागर लाळगे, अमित तोरडमल, सागर मांडगे, माजी विद्यार्थी संघटनेचे अनेक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.