दादा पाटील महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त

कर्जत (प्रतिनिधी) :- वर्षभर अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. २० ते २२ जून या कालावधीत आषाढी वारीनिमित मूल्यशिक्षणाची निकड लक्षात घेता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत प्रबोधनात्मक ‘विद्यार्थी-शिक्षक कीर्तन महोत्सव’ चे आयोजन महाविद्यालयात करण्यात आलेले आहे.
या कीर्तन महोत्सवामधील २० जून रोजीचे हरिकीर्तन महाविद्यालयातील एफ. वाय. बी. कॉमचे विद्यार्थी ह.भ.प. प्रथमेश महाराज जाधव यांचे संपन्न झाले. बुधवार दिनांक २१ जून रोजी एस.वाय.बी.ए.ची विद्यार्थिनी ह.भ.प. तेजश्री महाराज दिंडे यांचे हरिकीर्तन होणार आहे.
या कीर्तन महोत्सवामध्ये महाविद्यालयातील सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक व वारकरी संप्रदायातील भाविकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती लाभत आहे. बुधवार व गुरुवारच्या हरिकीर्तनाचाही सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.
महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समिती, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, माजी विद्यार्थी संघटना, एन.सी.सी. विभाग, एन.एस.एस. विभाग, पॅरा मिलिटरी विभाग, यीन विभाग हे या महोत्सवाच्या संयोजनामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत.
उद्योजक भीमराव(आप्पा) नलवडे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. मोहनराव खंडागळे यांच्यावतीने तीन दिवसीय कीर्तनाच्या सांगतेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन महाविद्यालयातच करण्यात आलेले आहे.