पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोनाली मंडलिक ला सुवर्णपदक

कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिकेने सांगली येथे पार पडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. तिला कुस्ती मार्गदर्शक माननीय किरण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य व कर्जत जामखेडचे आमदार मा.आमदार रोहित दादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष मा.राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी चे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा.अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बप्पासाहेब धांडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर शारीरिक संचालक डॉ.संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा.शिवाजी धांडे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी सोनाली मंडलिकला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.