भाजपाची तालुका कार्यकारिणी केली जाहीर,निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी: तालुकाध्यक्ष शेखर खरमरे

कर्जत (प्रतिनिधी) :- भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन तालुका कार्यकारिणी जाहीर केली. कर्जत तालुक्यात भाजपाचे अतिशय मजबूत संघटन आहे. काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना कामाची संधी मिळावी त्यांच्या निष्ठेचा संघटनेला फायदा मिळावा आणि या पदाधिकाऱ्याने संघटनेचे काम सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावे या हेतूने सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात येत असल्याचे खरमरे यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या संघटनेत नवनियुक्त कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे त्याचा फायदा संधी मिळालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांने उपयोग करून घ्यावा. कार्यकर्त्यांनी पदाला न्याय द्यावा. मिळालेल्या कालावधीत पक्ष्याच्या ध्येय धोरणाशी, वैचारिकतेशी प्रामाणिक राहून काम करावे व संघटनेला बळ द्यावे असे म्हणत आ.राम शिंदे साहेब यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. खा डॉ.सुजय विखे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा कर्जत तालुकाध्यक्षा श्री शेखर खरमरे यांनी ही नवनियुक्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या …
यावेळी प्रतिक्रिया देताना श्री. शेखर खरमरे यांनी असे म्हटले कि सामान्य कार्यकर्त्यांला संघटनेत स्थान देऊन पक्षाची विचारधारा शेवटच्या घटकापर्यत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. इतर पक्षाची अवस्था संघटनात्मक दृष्ट्या अतिशय केविलवाणी आहे, अद्याप पर्यंत काही पक्षाच्या गटांना जसे कि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांना अध्यक्ष देण्यात अपयश आलेले आहे. कार्यकारिणी तर दूरचा विषय आहे कार्यकत्यांची अवहेलना केली जात आहे. संघटनात्मक दृष्ट्या अतिशय कमकुवत अवस्था या गटाची झाली आहे… असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले
यावेळी जिल्हा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, उपस्थित होते.
तालुका कार्यकारीणी अशी :
तालुकाध्यक्ष : शेखर खरमरे, तालुका उपाध्यक्ष : युवराज शेळके, रमेश अनारसे, सुरेश मोढळे, प्रकाश शिंदे, संतोष निंबाळकर, संभाजी बोरुडे, सुनील काळे, समीर जगताप. तालुका सरचिटणीस : पप्पूशेठ धोदाड,
राहुल निंभोरे, दत्तात्रय मुळे. तालुका चिटणीस : संतोष फरांडे, कल्याण नवले, सारंग घोडेस्वार, विष्णू गदादे, मंगेश थोरात, विठ्ठल अनभुले, प्रकाश पठारे. सोशल मीडिया प्रमुख : काकासाहेब पिसाळ. प्रसिद्धी प्रमुख : दिपक गावडे.
युवा मोर्चा तालुकाध्यक्ष : निळकंठ शेळके. कर्जत शहराध्यक्ष : गणेश क्षीरसागर. राशीन शहराध्यक्ष शिवाजी काळे. मिरजगाव शहराध्यक्ष : संदीप बुद्धीवंत. ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष : अजित अनारसे. ओबीसी मोर्चा सरचिटणीस : पांडुरंग क्षीरसागर. वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष : नंदलाल काळदाते. भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष : भाऊसाहेब गावडे. भटक्या विमुक्त आघाडी सरचिटणीस : प्रशांत शिंदे. किसान आघाडी तालुकाध्यक्ष : गणेश जंजिरे. किसान आघाडी सरचिटणीस : उदयसिंग परदेशी. अनुसूचित जाती जमाती आघाडी : प्रवीण लोंढे. सांस्कृतिक आघाडी तालुकाध्यक्ष : सुनील पोकळे. महिला आघाडी तालुकाध्यक्ष : प्रतिभा रेणुकर. कर्जत शहर महिला अध्यक्ष : आशाताई कामगार आघाडी तालुकाध्यक्ष.अनिल खराडे. दिव्यांग सेल
तालुकाध्यक्ष : सुहास गावडे. अल्पसंख्यांक आघाडी: फारुख पठाण.
विशेष निमंत्रित सदस्य
डॉ. रमेशचंद्र झरकर, अल्लाउद्दिन काझी, बाप्पाजी पिसाळ, शिवाजी अनभुले, काका धांडे, शांतीलाल कोपनर, अशोक खेडकर, सचिन पोटरे, प्रवीणदादा घुले, सुनील गावडे, मंगेश जगताप, काकासाहेब तापकीर, बापूराव ढवळे, प्रकाश शिंदे, अनिल गदादे, विक्रम राजेभोसले, नितीन पाटील, नंदकुमार नवले, संपतराव बावडकर, लहूजी वतारे, बंडा मोढळे, अभय पाटील, माणिकराव जायभाय, एकनाथ धोंडे, पांडुरंग भंडारे, तात्यासाहेब माने, दत्ता भंडारे, तात्यासाहेब माने, दत्ता गोसावी, सोयब काझी, चिंतामण सांगळे, तात्यासाहेब खेडकर, नरसिंग पवार, राजेंद्र शिंदे, हरिदास केदारी, दादा सोनमाळी, सारंग पाटील, बंडा मोरे, संभाजी बोरुडे, अश्विनी गायकवाड, शरद म्हेत्रे, बबनराव लाढाणे, उमेश जपे, नागनाथ जाधव, भरत पावणे, रमेश पवार, विलास निकत, अशोक शिंदे, भगवान शिंदे, वाल्मिक साबळे, संजय तापकीर, शिवाजी वायसे, मनोहर वायसे, डॉ. संदिप बरबडे, रावसाहेब खराडे, भाऊसाहेब पाटील, काका ढेरे, शरद गांगर्डे, दिपक सोंडगे, योगेश शर्मा, कांचन खेत्रे, राणीताई गदादे, आरतीताई थोरात, मनीषाताई वडे, नीताताई कचरे, दत्तात्रय मुळे.