श्रीलंका विद्यापीठाशी खेड महाविद्यालयाचा शैक्षणिक सांमजस्य करार

कर्जत (प्रतिनिधी) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, खेड आणि रिसर्च सेंटर ऑफ सोशल सायन्सेस, फॅकल्टी ऑफ सोशल सायन्सेस, युनिव्हर्सिटी ऑफ केलानिया, दलुगामा, कैलानिया, श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी भूगोलचे प्राध्यापक आणि संचालक, सामाजिक विज्ञान संशोधन केंद्र, सामाजिक विज्ञान विद्याशाखा, केलानिया विद्यापीठ, दलुगामा, केलानिया, श्रीलंका, प्रा. डॉ. ए. जी. अमरसिंधे यांनी स्वाक्षरी करून हा करार स्थापित केला यावेळी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, भारतीय सामाजिक विकास संस्था आणि संशोधन, पुणे, डॉ. प्रवीण सप्तर्षी, डॉ. डी. एस. निकुंभ, महाविद्यालयाचे प्राचार्य,, भूगोल विभाग, अध्यक्ष, बोर्ड ऑफ स्टडीज चे मेंबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, प्रा. डॉ. ए. एच. मुसमाडे, विश्वस्त, भारतीय सामाजिक विकास संस्था आणि संशोधन, पुणे, डॉ. ज्योतिराम मोरे, आय. क्यू. ए.सी, समन्वयक, प्रा. एस. एस. व्हंडकर, प्रा. डॉ. संतोष शिंदे, प्रा. गोरक्ष भापकर, प्राचार्य, लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व जी. डी सप्तर्षी जुनिअर कॉलेज, खेड तसेच राष्ट्रपिता महाविद्यालय यांचा स्टाफ व लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व जुनिअर कॉलेज स्टाफ या कार्यक्रमास उपस्थित होता.
या सामंजस्य कराराचे प्रमुख घटक
1) लायब्ररी, डेटाबेस, दस्तऐवजीकरण आणि इन्स्ट्रूमेंटल आणि इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधा वापर करणे आणि माहितीची देवाणघेवाण करणे,
ii) शिक्षक (अतिथी व्याख्याता म्हणून) आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, संयुक्त कार्यशाळा/सेमिनार / संशोधन प्रकल्प आयोजित करणे
Ⅲ) व्याख्याने आणि संशोधन उपक्रमांसाठी प्राध्यापक सदस्य आणि विद्याथ्यांच्या भेटींची देवाणघेवाण करणे, या सामंजस्य करारात या प्रमुख गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.