जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची छत्रपती जिनिंग अँड ऑईल मिल ला भेट.

कर्जत (प्रतिनिधी) :- मिरजगाव येथील जिजाऊ इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थीनी छत्रपती जिनिंग अँड प्रोसेससिंग ऑईल मिल या कारखान्याला भेट देत कापूस खरेदी पासून ते सरकी पेंड निघून त्याची प्रोसेस कशी चालते याची सविस्तर माहिती घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फक्त शाळा व तेथील उपक्रमा शिवाय इतर काही माहिती नसते तसेच ग्रामीण भागात बहुतेक करून शेतकरी वर्ग जास्त आहे या भागात कापूस उत्पादन जास्त प्रमाणात होते प्रत्येक मुलांना कापूस आपल्या शेतात लावणी पासून काढणी पर्यंत माहीत असतो तो कडून त्याचे पुढे काय होते ते त्यांना माहीत नसते कापूस काढून तो व्यापारी यांना विक्री केली जाते आणि त्याचे पैसे मिळतात एवढेच माहीत असते पण आपले बाबा शेतात कापूस लावतात त्याचे 4-5 महिने लावणी करणे, खाते टाकणे, पाणी देणे, कापूस येईपर्यंत त्याची वाट पाहणे त्यामध्ये दिवस रात्र अमाप कष्ट करून ते पीक जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल यासाठी प्रयत्न करतात हेच फक्त मुलांना माहीत असते पुढे त्या कापसाचे काय केले जाते हे माहीत होण्यासाठी जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती जिनिंग व ऑइल मिलला भेट देत तेथे कापूस मशीन मध्ये जाऊन कापूस व सरकी वेगळी करून सरकी पासून ऑइल आणि सरकी पेंड तयार केली जाते व त्या ऑईलपासून साबण तयार होतो.
तसेच जी सरकी पेंड तयार होते ती आपले पशुधन आहे त्यांना खायला तयार होते याची सविस्तर माहिती जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली स्कूल बरोबरच इतर क्षेत्रातील अवांतर ज्ञान मुलांना असावे यामधील भविष्यातील भावी नवं उदोयजक तयार व्हावेत अशी प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे यांनी बोलताना सांगितले तसेच मुलांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे ते लहानपनापासूनच त्याचे मनात रुजवून त्यांची वाटचाल व्हावी या दृष्टिकोनातून अभ्यास दौरा केला. यासाठी छत्रपती जिनिंग व ऑइल मिल चे संचालक राहुल शेठ पवार व बांदल सर यांनी मुलांना प्लांट विषयी सविस्तर माहिती दिली तसेच मुलांना खाऊ वाटप केले.
यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे व सचिव शर्मिला केशव शिंदे यांनी मार्गदर्शन केले होते त्यानुसार सहाशिक्षक उर्मिला त्र्यंबके, सरिता लाढणे, निकिता माळवदे, सुरेखा क्षिरसागर, प्रतीक्षा उल्हारे, प्रियदर्शनी मुंगीकर, आशा पवार, पांडुळे काका, दत्तात्रय सकट, संतोष कोरडे, जालिंदर बनकर, दत्तात्रय खेडकर, क्रिश शिंदे यांनी सहकार्य केले