ब्रेकिंग
गोवा येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेकरिता दादा पाटील महाविद्यालयाच्या सोनाली मंडलिकची निवड

Samrudhakarjat
4
0
1
9
4
5
कर्जत (प्रतिनिधी) :- गोवा येथे होणाऱ्या नॅशनल गेम राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद, पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने राज्यस्तरीय कुस्ती चाचणी नुकतीच घेतली. त्यामध्ये कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने ५७ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने तिची निवड गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कुस्ती संघाकडून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाची सोनाली मंडलिक सहभागी झाल्याबद्दल तिचे महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.