निवडणुकीत साथ द्या ग्रामपंचायत सदस्याचे काम काय असते ते कामाच्या रूपाने दाखवून देईल ; सौ कुसुम साळवे.

राशीन( प्रतिनिधी ) जावेद काझी. :- राशीन ग्रामपंचायत निवडणुकीचे वार्ड क्रमांक १ ते ६ . मधील आरक्षण काही दिवसा पूर्वी जाहीर झाली असून. पुढील काही दिवसात ग्रामपंचायत निवडणूक लागण्याची शक्यता दाट भासत असून निवडणुकीची तारीख घोषित होणे बाकी आहे .नेते उमेदवार कार्यकर्ते यांचा मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा वेग वाढला असून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली असून दोन किंवा तीन पॅनल होण्याची शक्यता दिसत आहे.
तरी प्रभाक क्रमांक 3 मधुन पुन्हा एकदा आपले नशीब आजमवण्यासाठी लढण्याची तयारी सौ.कुसुम महादेव साळवे या उमेदवार इच्छुक आहेत.गेल्या निवडणुकीत अगदी थोड्या मताने पराभाव झाला मात्र येणारया निवडणुकीत साथ द्या एका ग्रामपंचायत सदस्याचे काम काय असते ते दाखवुन देण्यासाठी एक वेळेस संधी द्यावी ग्रामपंचायत मधील सर्वसामान्य जनतेच्या काम करण्याची कार्यशैली पद्धत कशी असते ते दाखवून येण्याचा प्रयत्न नक्कीच करेन यासाठी वार्ड क्रमांक ३ मध्ये सदस्य होण्याची संधी द्या संधीचे सोने नक्कीच करून दाखवेल असे आश्वासन सौ. कुसुम महादेव साळवे यांनी मतदारांना दिले आहे.