
समृध्द कर्जत / प्रतिनिधी : – कर्जत शहरातील बुवासाहेब नगर येथील लांडघुले निवस्थानी राहत असणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
वैष्णवी शिवाजी खिळे रा. बेलगाव कानडी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती लांडघुले चालवत असलेल्या मुलींच्या होस्टेल मध्ये ही घटना घडली आहे. लांडघुले यांच्या निवस्थानाच्या
चौथ्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत ओढणीने गळफास घेवून तिने आपली जीवनयात्रा संपवली.आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार रवींद्र वाघ व कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. ही मुलगी दादा पाटील महाविद्यालयात शिकत होती. मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.लांडघुले निवस्थानी असणाऱ्या होस्टेल वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नव्हते तसेच संरक्षक भिंत ही नाही याशिवाय महिला कर्मचारी देखील नेमणूकीस नसल्याने मुलींची सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
या होस्टेल साठी नगरपंचायत ची परवानगी घेतली नाही. सरकारने कोणाताही भाडेकरू ठेवताना पोलीस व नगरपंचायतला संपूर्ण माहिती व करारपत्राची माहिती देणे आवश्यक असते पण येथे कोणताही नियम पाळण्यात आला नाही.
या लांडघुले निवस्थानी चालू असलेले होस्टेल हे निवस्थाचा वापर हा क्रमर्शिल स्वरूपाचा आहे. त्यामुळे मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी हे होस्टेल चालविणा-या लोकांनी घेणे आवश्यक आहे. कर्जत हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असल्याने अनेक पालक हे कर्जत ला शिक्षणासाठी पाठवतात. अनेकांना वाहनांची सोय उपलब्ध नसल्याने अनेकांना रूम करून किंवा खाजगी होस्टेल वर राहावे लागते. त्यामुळे पालक आपल्या गावी तर पाल्य शिक्षणासाठी कर्जत ला मग यावर लक्ष कोणाचे मग आशा घटना घडत असतात. त्यामुळे जर होस्टेल चालविणा-या संचालकांनी जर सुरक्षेची जबाबदारी घेवून सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नुसते पैसे कमविणे हा उद्देश न ठेवता मुला मुलींची सुरक्षा बरोबरच शैक्षणिक प्रगती देखील पाहून योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक व गरजेचे बनले आहे. तरच आशा आत्महत्या रोखल्या जातील.