आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ढेरे मळा येथील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

कर्जत (प्रतिनिधी) :- आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नजिकच्या ढेरे मळा येथील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहर कार्यअध्यक्ष भूषण ढेरे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला.
अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडून हा सामाजिक उपक्रम घेतला जात आहे.
यावेळी सुनंदाताई पवार, नामदेव राऊत, संतोष म्हेत्रे दिलीप ढेरे बाळासाहेब साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, गट नेते संतोष म्हेत्रे, नगरसेविका लंकाताई खरात तसेच ढेरेमळा येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला आदी मान्यवर उपस्थित होते…