पारनेर सैनिक बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

कर्जत (प्रतिनिधी) :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. रविवारी सकाळी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ कर्जत येथील श्री संत गोदड महाराज मंदिर येथे झाला. १७ पैकी ११ जागा बिनविरोध झालेल्या आहेत.
यावेळी बोलताना श्रीकांत तोरडमल म्हणाले, भाकरी फिरवली पाहिजे म्हणून राजेंद्र जगताप यांना आ. निलेश लंके व शिवाजीराव व्यवहारे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये देण्यात आली आहे. सर्व सहा उमेदवारांना निवडून द्यावे. राजेंद्र जगताप म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खूप प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही. विघ्न संतोषी माणसांनी बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र बॅंकेत कोठेही भ्रष्टाचार झालेला नाही.
गटनेते संतोष मेहेत्रे म्हणाले, समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून ही बॅक चालू झाली. कोणत्याही प्रकारचा राजकीय वापर होत नाही. निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक होते पण काही लोकांमुळे ती झाली नाही. पुढच्या सहा लोकांची डिपाॅझिट वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. अनिल गदादे यांनी आभार मानले. यावेळी पप्पूशेठ नेवसे, पप्पूशेठ तोरडमल, उपमन्यू शिंदे, सत्यवान शिंदे, राजेंद्र खराडे, गोपाळ कापसे, नितीन तोरडमल, ॲड. नवनाथ कदम, गणेश मेहेत्रे आदी उपस्थित होते. यावेळी रामदास फरांडे, गंगाराम बनसोडे यांची भाषणे झाली.