ब्रेकिंग
कर्जत पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांचा राशीन मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार.

Samrudhakarjat
4
0
1
9
4
2
राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांनी कर्जत पोलीस स्टेशनचा पदभार नुकताच स्वीकारला असून मुळूक यांनी या अगोदर हिंगणघाट ,सावनेर, नागपूर ग्रामीण आदी पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष कामगिरी निभावली आहे, या जाबाज पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांचा सत्कार राशीन मुस्लिम समाजाच्या वतीने फेटा, बांधून शाल ,श्रीफळ, देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देत,कर्जत पोलीस स्टेशन कार्यालयात करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते साहिल दादा काझी, समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी, जे .के .मोटर्सचे संचालक जाकीर भाई काझी, सहारा मोटर्स चे जमीर काझी, राशीन पैगाम चे इक्बाल शेख, तसेच .कर्जत चे सामाजीक कार्यकर्ते मुदस्सर झारेकरी,सोनुभाई सय्यद,आफताब पठाण,चांदा येथील आवेज सय्यद,इक्बाल पप्पु सय्यद आदी मान्यवर ऊपस्थीत होते.